साहित्य – ५00 ग्रॅम काळी द्राक्षं, ३ लिटर दूध, ५00 ग्रॅम साखर, ड्राय फ्रूटस्चे काप आणि २ थेंब द्राक्षाचा इसेन्स.
कृती:- दूध उकळावं. साखर घालून ते आटवावं. ते आटून निम्म्याहून कमी राहिल इतकं दाट करावं. द्राक्षांचा रस काढून तोही उकळून दाट होईपर्यंत आटवावा. दोन्ही मिश्रणं पूर्णपणे गार झाल्यावर ती एकत्र करून इसेन्स टाकून मिक्सरमधून काढावीत. नंतर त्यात ड्रायफ्रूटस्चे काप घालून मिश्रण कुल्फीच्या साच्यात भरून फ्रीजरमध्ये ठेवावं. १0-१२ तासांनी कुल्फीच्या साच्यातून कुल्फ्या काढाव्यात. या कुल्फ्यांच्या वरती द्राक्षांच्या पातळ स्लाइसेस ठेवून त्या खाण्यास द्याव्यात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply