साहित्य : किसलेला दुधी भोपळा (सोलून बिया काढून), १ टिस्पून तूप,पाऊण कप कंडेन्स मिल्क,१ टिस्पून बदामाचे काप (बदाम भिजवून साल काढावे),१ टिस्पून इतर ड्रायफ्रुट्स जसे काजू,पिस्ता,बेदाणे,१/४ टिस्पून वेलची पूड.
कृती ः पॅन गरम करुन त्यात तूप घालावे. तूप वितळले कि किसलेला दुधी घालून परतावे. साधारण १० मिनिटांमध्ये दुधीमधील पाणी निघून जाईल.दुधी शिजला कि कंडेन्स मिल्क घालावे आणि घट्टपणा येईस्तोवर परतत राहावे. सुकामेवा घालावा,वेलची पूड घालून मिक्स करावे. थोडावेळ परतून घ्यावे. असा हा झटपट दुधी हलवा गार किंवा कोमट कसाही छान लागतो.
Leave a Reply