
साहित्य : ४ अंडी,तेल,कांदा,टोमॅटो,धणे-जिरे पावडर,तिखट,हळद,कोथिंबीर,मीठ.
कृती : प्रथम एका पॅनमध्ये तेल तापवून घ्या. त्यावर एक बारिक चिरलेला कांदा चांगला लालसर परतून घ्या. मग त्यात टोमॅटो घालून परतून घ्या. त्यात धणे-जिरे पावडर,हळद,तिखट,मीठ घाला व थोडा पाण्याचा हपका मारुन हे मिश्रण शिजवून घ्या. त्यानंतर या मिश्रणात ४ खोलगट भाग करुन त्यावर ही अंडी फोडा.वरुन थोडी मिरपुड आणि बारिक चिरलेली कोथिंबीर घालून झाकण ठेवून एक वाफ काढा.
Leave a Reply