
सुरत रेसिपी : मोठ्या तव्यावर अमूल बटर गरम करणे. त्यात बारीक चिरलेला कांदा घालणे. त्यात आले,लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर याची पेस्ट घालणे व परतणे. हळद, लाल मिरची पावडर, मीठ, घालणे व परतणे, लसणीची पात घालणे व मिक्स करणे, थोडेसे पाणी घालून पावभाजीच्या मॅशरने मॅश करणे, त्यात उकडलेले अंडे सुरीने स्लाईस तुकडे करून घालणे, थोडे चीझ किसून घालणे, एक उकडलेले अंडे किसून घालणे, व चिरलेली कोथिंबीर घालणे.
एका वाटीमध्ये अंडे फेटून घेणे त्यात मीठ, हळद, काळी मिरे पावडर घालून त्याचे तव्यावर ऑमलेट करून घेणे, ऑम्लेट प्लेटमध्ये काढणे व त्यावर वरील तयार केलेली घट्ट ग्रेव्ही ठेवणे.
Leave a Reply