वांग्याचे लोणचे

साहित्य:

• ७५० ग्रॅम लहान गोल वांगी,
• १० लसूण पाकळ्या,
• २ इंच आले, १५ लाल मिरच्या,
• ११५ मिली व्हिनीगर,
• ५ चमचे मोहरीची डाळ,
• १ चमचा हळद, १२५ ग्रॅम गूळ,
• ६ मोठे वेलदोडे, १ इंच दालचिनी,
• ४ लवंगा, १० मिऱ्याचे दाणे,
• ६ मोठे चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी,
• ५ चमचे मीठ

कृती:

• आले-लसूण बारीक वाटून घ्यावे. लाल मिरच्या चमचाभर व्हिनीगरमधे बारीक वाटाव्या.
• गूळ व्हिनीगरमध्ये विरघळवून ठेवावा. वांगी धुवून पुसून ठेवावी. व त्यांचे १ सें.मी. जाड काप चिरून ठेवावे.
• कल्हईच्या पातेल्यात तेल तापले की मोहरी व हळद घालून त्यावर आले-लसूण तांबूस होईपर्यंत परतावी.
• त्यात वांग्याचे काप घालून हलक्या हाताने पातेलीत घालून अवसडावे. वांगी मंदाग्निवर शिजू द्यावीत.
• एकीकडे वेलची, लवंगा, दालचिनी व मिरी यांची बारीक पूड करावी. वांगी मधूनच एकदोनदा झाऱ्याने अलगद ढवळावीत.
• वांगी शिजली की गुळाचे मिश्रण घालावे. दाटसर रस होईपर्यंत शिजवावे. नंतर लवंग-दालचिनी इत्याचीची पूड घालावी.
• मोहरीची डाळ व मीठ घालावे. खाली उतरवून लोणचे गार होऊ द्यावे. नंतर काचेच्या बरणीत भरून ठेवावे.
• आठदहा दिवसांपेक्षा जास्त टिकत नाही.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

Avatar
About संजीव वेलणकर 617 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*