साहित्य: २ कप फ्लॉवरचे तुरे, १ अगदी लहान कांदा तुकडे करून, १ टेबलस्पून बारीक चिरलेली सेलरी (फक्त दांडे घ्या), १ टीस्पून घरचं लोणी किंवा बटर, १ कप दूध, मीठ आणि मिरपूड चवीनुसार.
कृती: एका लहान कुकरमध्ये लोणी गरम करा. त्यावर कांदा घालून पारदर्शक होऊ द्या. नंतर त्यात फ्लॉवरचे तुरे घालून जरासं परता. त्यात दूध आणि अर्धा कप पाणी घाला. कुकरचं झाकण लावून शिटी काढा. गार झाल्यावर मिक्सरमध्ये वाटा. गाळायची गरज नाही. त्यात मीठ आणि मिरपूड घालून उकळा. सेलरी घाला आणि मंद गॅसवर ५ मिनिटं उकळा.
याच पद्धतीनं ब्रॉकोलीचंही सूप करता येतं.
Leave a Reply