साहित्य : गाजर, लिंबू, दाण्याचे कुट, तेल, मोहरी, हिंग, हळद, साखर आणि मीठ.
कृती : सर्वप्रथम गाजरं किसून घेणे. त्यानंतर त्यामध्ये साखर आणि मीठ घालून लिंबाचा रस घालणे. व त्यावर दाण्याचे कुट घालून हे सर्व मिश्रण एकत्र करुन अर्धा तास ठेवणे. त्यानंतर तेल तापवून ते तापल्यावर मोहरी घालणे. मोहरी तडतडल्यावर हिंग घालून गॅस बंद करणे. व ही फोडणी गाजरावर ओतून हवा असल्यास नारळाचा चव व थोडी कोथिंबीर घालून ढवळून घेणे.
— सौ. सुनिता दामले
Leave a Reply