साहित्य: २०० ग्राम खवा
१ कप दूध
१०० ग्राम साखर
२ चिमूट केशर
१ लहान चमचा वेलची पावडर
बारीक चिरलेले बदाम, पिस्ता
कृती: प्रथम खवा मळून घ्यावा.
पेढा करण्याआधी दूधात केशर मिक्स करून ठेवावे. तयार खवा नॉनस्टीक फ्राईंग पॅनमध्ये घ्यावा त्यात साखर घालावी. मध्यम आचेवर ढवळत राहावे. ५-७ मिनीटात साखर आणि खवा यांचे पातळसर मिश्रण तयार होते. त्यात दूध घालावे. आणि मिडीयम लो गॅसवर सारखे ढवळत राहावे. मिश्रण जरा घट्ट झाले त्यात वेलची पावडर घालावी. जवळ जवळ २८-३० मिनीटांनी पेढ्यांसाठी घट्ट गोळा तयार होतो.
मिश्रण अगदी थोडा वेळ निवळू द्यावे, शक्यतो मिश्रण गरम असतानाच पेढे वळावेत. हातांच्या तळव्यांना थोडे तूप लावून पेढे वळावेत. सजावटीसाठी पेढ्यांना वरती बदाम, पिस्त्याचे काप लावावेत.
टीप: पेढे जर पिवळ्या रंगाचे हवे असतील त्यात खायचा रंग घालावा. पेढे ५-६ दिवस फ्रिजमध्ये व्यवस्थित टिकतात. पेढे बनवल्यावर दोन एक दिवसांनी पेढ्यांचा गोडपणा जरा वाढतो, त्याप्रमाणे साखर कमीजास्त करावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply