घावन :-
तांदूळ स्वच्छ धुवून सावलीत वाळवावे. नंतर दळून आणावे.आपल्या अंदाजाने पीठ घ्यावे. त्यात थोडे मीठ व पाणी घालून धिरड्यासाठी पीठ भिजवतो तसे भिजवावे. सपाट तव्याला तेलाचाहात फिरवून त्यावर वरील पिठाची धिरडी घालावी. ह्याला घावन असे म्हणतात. हे घावन घाटल्याबरोबर खाण्याची पद्धत आहे.
घाटले :-
घाटले म्हणजे तांदळाचे पीठ गूळ-खोबरे वगैरे घालून केलेली एक प्रकारची खीरच आहे.
साहित्य :-
५ ते ६ वाट्या पाणी १ वाटी बारीक चिरलेला गूळ अर्धी वाटी तांदळाचे पीठ दीड वाटी ओले खोबरे अर्धा चमचा मीठ ८ ते १० वेलदोड्याची पूड.
कृती :-
एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवावे. त्यात गूळ, ओले खोबरे, मीठ व वेलदोड्याची पूड घालावी.दुसऱ्या लहान पातेलीत तांदळाच्या पिठात १ वाटी पाणी घालून कालवून घावे व सरसरीत करावे. वरील पाण्याला उकळी आली की त्यात हे कालवलेले पीठ ओतावे. उकळून जरा दाटसर झाले की उतरवावे. निवल्यावर घाटले फार दाट होते. म्हणून फार दाट करू नये. वरील प्रमाणाने केलेले घाटले ५।६ मंडळींना जेवण्याच्या वेळी पुरते.
— संजीव वेलणकर, पुणे
९४२२३०१७३३
छायाचित्र – इंटरनेटवरुन
Leave a Reply