या पदार्थाला पूर्वीच्या काळी “शालीपुफ’ असेही म्हणत असत.
साहित्य:- पांढरा गोंद(डिंक) एक वाटी (कुटून त्याचा रवा करून घ्यावा), रवा एक वाटी, खाण्याचा सोडा चिमूटभर, दही दोन चमचे, खसखस चार चमचे, तूप तळायला, साखरेचा घट्ट पाक एक वाटी, दूध चार चमचे.
कृती:- सर्व प्रथम पांढरा गोंद कुटून त्याचा रवा काढून घ्यावा. त्यामध्ये गव्हाचा रवा, सोडा मिसळून घ्यावा. नंतर एक चमचा दही व थोडे दूध घालून याचा गोळा मळून घ्यावा. नंतर त्यातील लिंबाएवढा गोळा घेऊन त्याची पुरी लाटून ती खसखसवर थापावी. खसखस लावलेली बाजू वर ठेवून मंद आचेवर अनारसे तळून घ्यावे. अनारसे तळून झाल्यानंतर त्यावर एक-एक चमचा साखरेचा पाक घालावा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply