साहित्य :-
हिरवट रंगाची सीडलेस द्राक्षे अर्धा किलो, साखर पाऊण किलो, सायट्रिक अॅसिड एक लहान चमचा, प्रिझर्व्हेटिव्ह अर्धा चिमूट, पाणी पाऊण लिटर.
कृती :-
द्राक्षे अर्धा तास थोडे मीठ घातलेल्या पाण्यात घालून ठेवा. पुन्हा स्वच्छ पाण्याने धुऊन त्याची देठे काढून टाका. त्याचा रस काढा. गाळून ठेवा. पातेल्यात साखर पाणी एकत्र करुन उकळा. उकळी आल्यावर त्यात सायट्रिक अॅसिड घालून मिश्रण खाली करा. स्वच्छ फडक्याने गाळून घ्या.
थंड करा. पूर्णपणे थंड झाला की त्यात रस घाला. त्यातील थोडे मिश्रण कपात घेऊन त्यात प्रिझर्व्हेटिव्ह टाकून कालवून घ्या. मिश्रणात टाका. हालवून घ्या. तयार झालेला स्क्वॅश स्वच्छ कोरड्या बाटल्यात भरून ठेवा.
Leave a Reply