
साहित्य: १/४ कप लसूण पाकळ्या, १/२ कप भरून हिरव्या मिरच्यांचे तुकडे (मध्यम तिखट), १/४ कप व्हिनेगर, दीड टीस्पून मीठ, १/२ टीस्पून साखर, १/४ कप पाणी (किंवा गरजेनुसार).
कृती: मिक्सरमध्ये लसूण, हिरव्या मिरच्या, मीठ, आणि साखर असे वाटून घ्यावे. बारीक वाटले की त्यात पाणी घालून बारीक पेस्ट करून घ्यावी. चाळणीवर हे मिश्रण गाळून घ्यावे. डावेने घोटून जास्तीत जास्त सॉस गाळून घ्यावा. गाळलेल्या सॉसमध्ये व्हिनेगर घालून मिक्स करावे. लहान बाटलीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवावे.
Leave a Reply