साहित्य:- एक वाटी हिरवे वाटाणे, पाव वाटी काजूचे तुकडे, एक वाटी बासमती तांदूळ, आठ -दहा कढीलिंबाची पाने, अर्धी वाटी कोथिंबीर, दोन-तीन हिरव्या मिरच्या, फोडणीसाठी तेल, चवीला साखर, दोन वाटया गरम पाणी, चवीनुसार मीठ.
कृती:- बासमती तांदूळ अर्धा तास अगोदर भिजवून ठेवावा. कोथिंबीर , मिरच्या व कढीलिंब यांची बारीक करा. तेल गरम करून काजू-वाटाणे टाकून परतून घ्यावे . तांदूळ टाकून परतावे. बारीक केलेले पदार्थ हे टाका आणि मीठ, साखर चवीला टाकून गरम पाणी टाकून मंद गैसवर भात होऊ दयावा. वरून थोडेसे तूप टाकावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply