साहित्य : स्टफिंग साठी : दोन वाट्या हिरवे सोललेले मटार, एक वाटी किसलेला नारळ, १/४ वाटी कोथिंबीर, १ चमचा हिरवी मिरची व जिरे पेस्ट, १ चमचा लिंबाचा रस, १/२ चमचा पावभाजी मसाला, १/४ चमचा साखर, मीठ.
आवरणासाठी : दोन वाट्या कणीक, दोन चमचे मैदा, तीन चमचे तेल, मीठ.
कृती : एका कढईमध्ये हिरवे सोललेले मटार घेऊन त्यात एक चमचा तेल सोडा व पाच मिनिटे परता. मटार थंड झाल्यावर मिक्सरमध्ये कुस्करून घ्या.आता हे मटार एका भांड्यात घेऊन त्यात किसलेला नारळ, कोथिंबीर, हिरवी मिरची व जिरे पेस्ट, लिंबाचा रस, पावभाजी मसाला, साखर आणि मीठ एकत्र करून घ्या. आपले स्टफिंग तयार आहे.
आता आवरणाचे सर्व साहित्य एकत्र करून कणिक मळून घ्या. त्याचा गोळा करून छोटी पुरी लाटून घ्या. आता त्यात आपण तयार केलेले स्टफिंग भरून लाटलेल्या पुरीला सर्व बाजूंनी बंद करून घ्या. आता तुम्हाला हवे असलेल्या आकारात पराठे लाटून घ्या आणि गरम तव्यावर तेल घालून पराठे दोन्ही बाजूंनी व्यवस्थितपणे भाजून घ्या.
Leave a Reply