साहित्य : पेरूचा गर १ वाटी, साखर १ वाटी, लिंबाचा रस अर्धा चमचा, मीठ चिमूटभर.
कृती : पेरूचे दोन तुकडे करून बियांसकट गर काढून वाफवून घ्या. नंतर मिक्सरमध्ये बारीक करून त्यात २ वाटय़ा पेरूच्या गराला १ वाटी साखर, अर्धा िलबाचा रस घालून मिश्रण घट्ट शिजवावे. मिश्रण चकचकीत होत आले की समजावे ते व्यवस्थित शिजले. नंतर बाटलीत भरून ठेवावे. पेरूचा गर काढण्याआधी त्यातील बिया काढून उरलेला पेरू मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावा. एका पॅनमध्ये साखर व पेरूचा गर घालून घट्ट होईस्तोवर शिजवून घ्यावे. सर्वात शेवटी त्यात िलबाचा रस, चिमूटभर मीठ व जिलेटिन घालून मिश्रण थंड करून बाटलीत भरावे.
टिप: जिलेटिन टाकण्यापूर्वी थोडय़ाशा पाण्यात गरम करून विरघळून घ्यावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२०१७३३
Leave a Reply