साहित्य:- मध्यम आकाराचे अर्धा किलो पेरू, १ मोठा चमचा दही (ताजं), दोन चमचे तेल, २ टोमॅटो, २ हिरवी मिरची, थोडंसं आलं, दालचिनी, मोठी वेलची, लवंग, अर्धा चमचा जिरं, हिंग, धने पावडर, मिरची पावडर, हळद,साखर, मीठ, मनुके, काजूचे बारीक तुकडे.
कृती:- पेरू घेऊन स्वच्छ धुवून-पुसून त्याच्या फोडी करा. त्यातल्या बियांचा भाग काढून टाका. टोमॅटो बारीक कापून हिरवी मिरची, थोडंसं आलं मिक्सरमध्ये फिरवून घ्या. ते बारीक झालं की दही घेऊन पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवा. काळी मिरी कमी (जास्त आपल्या आवडीनुसार), दालचिनी, मोठी वेलची आणि लवंग जाडसर कुटून घ्या. तेल कढईत तापलं की त्यात जिरं, मग हिंग यांची फोडणी करून मग कुटलेला मसाला त्यात घाला. मग धने पावडर, मिक्सरमधली दह्या-टोमॅटोची पेस्ट घालून तीन-चार मिनिटं मसाला शिजवून घ्या. त्यात पेरूच्या फोडी घाला. त्यात थोडी मिरची पावडर, हळद, मीठ आणि साखर घाला. आवडत असल्यास थोडे मनुके, काजूचे बारीक तुकडे घाला. नीट एकत्र करून घ्या. झाकण लावून पेरू नरम होईपर्यंत शिजवून घ्या. अर्धाकप पाणी घालून दोन-तीन मिनिटं शिजू द्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२०१७३३
Leave a Reply