साहित्य :
सारणासाठी : १ मध्यम आकाराचा नारळ,
२ कप दुध, ३/४ कप साखर, २ टे स्पून गुलकंद,१ टी स्पून वेलची पावडर, ५-६ काजू (तुकडे करून), ५-६ बदाम (तुकडे करून)
पारी साठी : २ कप रवा (बारीक), १ टे स्पून तूप (मोहनसाठी) मीठ चवी प्रमाणे,
१/२ कप दुध व लागेल तसे पाणी, मोदक तळायला तूप.
कृती :
नारळ खवून घ्या, त्यामध्ये साखर व दुध मिक्स करून शिजवायला ठेवा. मिश्रण घट्ट होई परंत शिजवावे मग त्यामध्ये वेलची पावडर गुलकंद, काजू, बदाम घालून मिक्स करावे.
बारीक रवा थोडा मिक्सरमध्ये थोडा ग्राईड करून घ्या. मग त्यामध्ये मीठ व कडकडीत तुपाचे मोहन घालून मिक्स करा. दुध व पाणी मिक्स करून रवा थोडासा सैल सर भिजवावा. (खूप सैल झाला तर मोदक खूप तुपकट होतील.) रवा भिजवल्यावर १० मिनिट झाकून बाजूला ठेवा. नंतर भिजवलेल्या रव्याचे एकसारखे मोठ्या लिंबा एव्ह्डे गोळे बनवावे. एक एक गोळा पुरी सारखा लाटून त्यामध्ये एक टे स्पून सारण भरून गोळा बंद करावा. आपल्याला पाहिजे तो आकार द्यावा.
कढई मध्ये तूप गरम करून विविध आकाराचे मोदक गुलाबी रंगावर तळून घ्यावे.
हे मोदक चवीला उत्कृष्ट लागतात.
— संजीव वेलणकर, पुणे
९४२२३०१७३३
Leave a Reply