
साहित्य – अर्धी वाटी गव्हाचं सत्व, 2-3 हिरव्या मिरच्या, 2 चमचे जिरे, कोथिंबीर, मीठ, ताक आणि साखर.
कृती – मिरची कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी. गव्हाच्या सत्वात दीड वाटी पाणी, एक वाटी ताक आणि मीठ-साखर घालून ते व्यवस्थित कालवून घ्यावं. एका जाड बुडाच्या पातेल्यात हे मिश्रण शिजायला ठेवावं. आधी 3-4 मिनिटं मोठय़ा गॅसवर आणि नंतर बारीक गॅसवर हे मिश्रण शिजू द्यावं.
मिश्रण शिजताना ते सतत ढवळत राहावं. त्याच्या गाठी होऊ देऊ नये. मिश्रण रटरटत घट्ट झालं की त्यात जिरे, मिरच्या, कोथिंबीर घालून एक-दोन मिनिटं ते शिजू द्यावं. गॅस बंद करावा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply