साहित्य: आटवलेलं दूध ( अर्धा लिटर होल मिल्क आटवून निम्मं करून घ्यावे. ),काळ्या बिन बियाच्या खजुराचे छोटे तुकडे , थोडा खजूर बारीक वाटून , थोडा मध,केळं, चिकू, द्राक्ष, किवी, सफरचंद, याचे छोटे छोटे तुकडे डाळिंबाचे, दाणे,थोडा सुका मेवा आणि वासासाठी वेलची पावडर.
कृती: आटवलेल्या दुधात वाटलेला खजूर आणि मध मिक्स करून घ्यावे. वेलची पावडर घालावी. एका उभ्या ग्लासात प्रथम फळांचे तुकडे , खजुराचे तुकडे परत फळांचे तुकडे असं लेअरिंग करावं. नंतर हळुवारपणे आटवलेलं दूध त्यावर घालावं. वरून थोडा सुका मेवा, डाळिंबाचे दाणे सजावटी साठी घालावेत. आपले हेल्दी फ्रुट डेझर्ट तयार आहे.
Leave a Reply