कसे ओळखावे कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे

आंब्याचा सीझन जोरात चालू झाला आहे. उन्हाळ्यातील सर्वांचाच आवडता पदार्थ म्हणजे आंबा आहे. जवळपस सर्वच लोकांना आंबे आवडतात. या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात आंब्यांची विक्री होते परंतु त्याच्या रंगावर किंवा सुगंधावर भुलून आंबे विकत घेऊ नका. कारण हे आंबे शेतातून थेट आपल्याला उपलब्ध न होता त्याची साठवणूक केली जाते. यादरम्यान अधिक नफा मिळवण्यासाठी आंबे विक्रेते कॅलशियम कार्बाईड पावडरच्या सहाय्याने कृत्रिमरित्या पिकवत असल्याच्या अनेक घटना उघड झाल्या आहेत. काही ऑरगॅनिक शॉप्समध्ये तसेच नैसर्गिकरित्या आंबे पिकवणार्या आंबे विक्रेत्यांकडे उत्तम दर्जाचे व सुरक्षित आंबे उपलब्ध असतात. मात्र तरीही कृत्रिमरित्या आंबे पिकवले जात असल्याने काही गोष्टींवरुन आपण हे सहज ओळखू शकतो. आंब्याची चव ही आंबे कृत्रिमरित्या पिकवले गेल्याची प्रमुख चाचणी आहे. नैसर्गिकरित्या पिकवलेले आंबे हे कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यांपेक्षा चवीला चांगले आणि रसदार असतात. झाडावरून काढलेला कच्चा आंबा नैसर्गिकरित्या पिकविण्यासाठी जरा जास्त कालवधीत लागतो. मात्र, बाजारात आंबा लवकरात लवकर आणवा या चढाओढीपायी आंबा लवकर पिकविण्यासाठी काहीजण कॅल्शियम कार्बाईडचा वापर केला जातो. मात्र, हे घातक असून, त्यावंर बंदी घालण्यात आलेली आहे.

फळ पिकविण्यासाठी सुरक्षित व कायदेशीर पद्धतीत नैर्सगिकरित्या किंवा इथिलिन गॅसने आंबा पिकवावा, असे अन्न व औषध प्रशासनाचे (अन्न) (एफडीए) अधिकारी सांगतात.

रंग.
कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यांवर हिरवे डाग असतात. आंब्यांवरचे हिरवे डाग हे केशरी किंवा पिवळ्या रंगात एकरुप होत नसल्याने ते वेगळे स्पष्ट दिसून येतात. याचप्रमाणे कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे हे नैसर्गिक आंब्यांपेक्षा अधिक पिवळट रंगाचे दिसतात.
चव. जेव्हा आपण कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे खातो, त्यावेळी तोंडामध्ये जळजळ होण्याची शक्यता असते. तसेच कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे खाल्ल्याने डायरिया (अतिसार), पोटदुखी तसेच घशात खाज अशा काही समस्या आढळून येतात.
आंब्याचा गर.

नैसर्गिकरित्या पिकवलेले आंबे हे केशरी रंगाचे असतात. कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यांचा रस हा हलका पिवळ्या रंगाचा असतो म्हणजेच तो पूर्ण पिकलेला नाही हे स्पष्ट होते. कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे हे बाहेरून पिकलेले दिसत असले तरीही ते आतून कच्चे असतात.
आंब्याचा रस.

नैसर्गिकरित्या पिकलेला आंबा हा कापल्यानंतर त्यातील रस गळायला सुरवात होते तसेच चवीलाही अत्यंत गोड असतो. मात्र कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यामध्ये फारच कमी रस असतो. कारण एथेल घटक आंब्यांना नैसर्गिकरित्या पिकवतो व आंब्यामध्ये अधिकाधिक रस निर्माण होतो. आंबे पिकवण्यासाठी काही घातक केमिकल्स व कीटकनाशकं वापरली जातात. त्याचा शरीरावर मोठ्या प्रमाणात वाईट परिणाम होतो. असे आंबे खाल्ल्याने शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडून मधूमेह, हायपोथायरॉईड अशा समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे खाल्ल्याने पार्कीसन्स, कर्करोग असे आजार जडण्याची शक्यता अधिक वाढते.

— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

Avatar
About संजीव वेलणकर 617 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*