साहित्य:- २ वाट्या जाड दलिया, २ वाट्या नारळाचा चव, २ चमचे खसखस, २ वाट्या गूळ, जायफळ व वेलदोड्याची पूड, थोडे तूप.
कृती:- दलिया भरपूर पाण्यात भिजत घालावा. नंतर उपसून त्यात ओले खोबरे व २ चमचे भाजलेली खसखस घालावी. हे मिश्रण कुकरमध्ये शिजवून घ्यावे. नंतर ते मोठ्या पातेल्यात काढून त्यात गूळ घालून एकत्र शिजवावे. खूप पातळ ठेवू नये. त्यात जायफळ व वेलदोड्याची पूड घालावी. वाढताना थोडे तूप घालावे. मूळ कृतीत दूध, तूप, खवा, साखर, सुकामेवा वगैरे काहीही नसल्याने डाएट करणाऱ्यांना हा पदार्थ फार आवडतो. आवडत असल्यास या खिरीत आपण नंतर थोडे दूध व सुकामेवा घालू शकतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply