साहित्य:- तांदूळ पीठ १ कप, पाणी एक कप, खोवलेला नारळ अर्धा कप, तूप एक चमचा, चवीपुरते मीठ.
कृती:- गरम पाण्यात तांदळाचे पीठ, तूप आणि मीठ घाला. मळून त्याचे गोळे करून घ्या. इडियप्पम पात्रात किंवा शेवपात्रातून ते केळीच्या पानावर कुरडय़ांसारखे घाला. हलक्या हाताने उचलून इडली पात्रात ठेवा. पाच ते दहा मिनिटे ठेवा. काहीजण इडली पात्रात ठेवताना त्यावर खोवलेला नारळ घालतात. इडली पात्रातून वाफवल्यावर चटणीबरोबर गरम गरम खायला द्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply