साहित्य: इडलीचे तळलेले तुकडे, कोबी, कांदा, गाजर, ढोबळी मिरची (सर्व भाज्या उभ्या चिरून घ्याव्यात), लसूण, मिरची, कांद्याची पात (बारीक चिरलेली), बारीक कुटलेली लसूण-मिरची, सोया सॉस, टोमॅटो सॉस, मक्याचं पीठ, मीठ, तेल
कृती: सर्वप्रथम छायाचित्रात दाखवल्याप्रमाणे इडलीचे तुकडे करून ते तळून घ्यावेत (इडल्या आदल्या दिवशी करून घ्याव्या). नंतर एका कढईत तेल घेऊन त्यावर बारीक कुटलेली लसूण-मिरची व उभ्या चिरून घेतलेल्या सर्व भाज्या घालाव्या. उभी चिरून घेतलेली लसूण व हिरवी मिरची आणि मीठ घालून भाज्या मंद आचेवर अर्धवट कच्च्या राहतील इतपत शिजवाव्या.
सोया सॉस, टोमॅटो सॉस आणि मक्याचे पीठ पाण्यात एकत्र करून घ्यावे आणि ते दुसऱ्या एका कढईत मंद आचेवर थोडे घट्ट होईपर्यंत शिजवावे आणि त्यात शिजवलेल्या भाज्या आणि इडलीचे तुकडे एकत्र करून घ्यावेत (toss करून घ्यावेत). खायला देताना वरून बारीक चिरलेली कांदा पात घालावी.
टीप: मक्याचे पीठ आचेवर लवकर घट्ट होते त्यामुळे भाज्या, इडल्या आणि सॉस चे मिश्रण थोडे थोडेच कढईत एकत्र करावे आणि खायला द्यावे.
Leave a Reply