
साहित्य : एक लिटर दूध, एक प्याला साखर, एक मोठा चमचा कॉर्नफ्लोअर, अर्धे पाकीट लाल रंगाची जेली.
कृती : जेली गरम पाण्यात घोळवून फ्रीजरमध्ये सेट करून घ्या व तुकडे कापा. थोडी जेली बाहेरच ठेवा. दूध उकळून निम्म झाल्यावर साखर व कॉर्नफ्लोअर टाका. उकळी आल्यावर चार-पाच मिनिटं शिजवा. थंड झाल्यावर जेलीचे तुकडे मिसळा. साचे फ्रीजरमध्ये थंड करून त्यात विरघळलेली जेली टाकून सेट करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply