
साहित्य :
१ नारळाचे खोबरे, १ १/२ वाटी बारीक चिरलेला गूळ, ४ /५ वेलदोडे, २ वाटया जोंधळ्याचे (ज्वारी) पीठ, मीठ, तूप.
कृती :
मैद्याच्या चाळणीने ज्वारीचे पीठ चाळून घ्यावे. नेहमीप्रमाणे नारळ आणि गुळाचे सारण तयार करून, शिजवून घ्यावे.
नेहमी मोदकाला घेतो, त्याप्रमाणे जितक्यास -तितके पाणी घ्यावे. एका जाड बुडाच्या पातेल्यात पाणी घालून त्यात मीठ व तूप टाकावे. पाण्याला उकळी येताच पातेले गॅसवरून खाली उतरवून त्यात पीठ घालून ढवळावे. नंतर गॅसवर ठेवून दोन वाफा आल्यावर उतरवावे व मळून घ्यावे आणि नेहमीप्रमाणे मोदक करावेत.
— संजीव वेलणकर, पुणे
९४२२३०१७३३
Leave a Reply