साहित्य:- दीड वाटी तुरीची डाळ, दीड वाटी साखर, अडीच वाट्या कणीक, एक चमचा जायफळ-वेलची पूड, दोन चमचे बदामाचे काप, एक वाटी तूप, कणीक.
कृती:- तुरीची डाळ शिजवा. नंतर त्यात साखर घाला व घट्ट पुरण शिजवा. हे पुरण वाटावे लागत नाही. नंतर त्यात वेलची-जायफळ पूड व बारीक केलेले बदामाचे काप घाला. नंतर भिजवलेल्या कणकेचा उंडा करून त्यात पुरण भरा. लहान आकाराच्या पुरणपोळ्या लाटा. तव्यावर दोन्ही बाजूने शेकून घ्या. आयत्या वेळी तूप लावून सर्व्ह करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply