आता पावसात छान कोवळं पडवळ मिळायला लागेल. आपण खमंग काकडी करतो तशी पडवळाची कोशिंबीर खाल्ली आहे का कधी ? नसेल तर ही नक्की करून बघा. पडवळ न आवडणाऱ्यांना पण ही कोशिंबीर आवडेल.
पडवळाच्या बिया काढून किसून घ्या. थोडेसे हातानी पिळून पाणी वेगळं काढा. पडवळाच्या किसात ठेचलेली हिरवी मिरची, कोथिंबीर,नारळ, लिंबाचा रस,भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट, मीठ आणि साखर घालून एकत्र करा. तूप, जिरे, हिंगाची खमंग फोडणी द्या. चविष्ट पडवळाची कोशिंबीर तयार आहे.
आणि हो, ते पडवळाच्या किसाचे पाणी काढलय त्यात थोडे काळे मीठ घालून पिऊन बघा. खूप पौष्टिक आणि चवदार असतं.
Leave a Reply