साहित्य : अर्धी वाटी कैरीच्या फोडी, थोडी हळद, मीठ, अर्धा चमचा लाल मिरची पूड, पाव चमचा मेथीचे दाणे, पाव चमचा उडदाची डाळ, दोन चमचे तांदूळ, अर्धी वाटी खोवलेले खोबरे, अर्धी वाटी नारळाचे दूध, गूळ (चवीसाठी)
कृती : करायच्या आधी थोडा वेळ कैरीच्या फोडींना हळद, मीठ आणि मिरची पूड लावून ठेवावी. धने, उडदाची डाळ आणि तांदूळ थोडेसे तव्यावर भाजून घ्यावेत. खोबरे, धणे, डाळ आणि तांदूळ एकत्र करून त्यांची गोळी वाटून ठेवावी. तेलावर हिंग, मेथी आणि थोडय़ा उडदाच्या डाळीची फोडणी देऊन त्यावर कैरीच्या फोडी घालाव्यात. वाफेवर थोडी शिजू द्याव्यात. फोडी साधारण शिजत आल्यावर त्यात वाटलेली गोळी घालावी. एक उकळी आल्यावर त्यात नारळाचे दूध व गूळ घालावा.
Leave a Reply