साहित्य : २०० ग्रॅम काजू , ३०० ग्रॅम पनीर , २०० ग्रॅम साखर, १ कप दूध, ३ चमचे तूप, १/२ चमचे वेलची पावडर , २ चमचे टुकडे केलेले पिस्ते.
कृती :
१) काजू पनीर बर्फी बनवण्यासाठी काजू दोन तास दूधात भिजवून ठेवा.
२) दोन तासानंतर दूध आणि काजू मिक्सर मध्ये बारीक करुन,एकत्र करुन त्याची पेस्ट करुन घ्या.
३) या पेस्टमध्ये साखर व बारीक केलेले पनीर एकत्र करुन मिक्सर मध्ये पुन्हा एकदा एकत्र करुन त्याची बारीक पेस्ट करुन घ्या.
४) आता एक नॉनस्टिक पॅन गरम करुन घ्या व त्यात दोन चमचे तूप घाला. या पॅनमध्ये काजू, साखर, पनीर यांची पेस्ट घाला.
५) आता हे मिश्रण घट्ट होईपर्यंत ढवळत राहा. आता तुमचे मिश्रण तय्यार आहे.
६) आता या मिश्रणात वेलची पावडर घालून गॅस बंद करा व टुकडे केलेले पिस्ते घाला.
७) दोन ते तीन तासात बर्फी तयार होईल. तयार झालेल्या बर्फीचे तुम्हाला हवे तसे काप करुन सर्व्ह करा.
८) तुमची स्वादिष्ट काजू पनीर बर्फी तयार आहे.
Leave a Reply