साहित्य :
चार कोवळ्या काकड्या, दही एक वाटी, चवीप्रमाणे मीठ आणि साखर, एक टेबलस्पून साजूक तूप. चिमूटभर हिंग व अर्धा चमचा जिरे.
कृती :
काकड्यांची साले काढून घ्या व त्या किसणीवर किसून घेऊन त्या किसात दही, चवीनुसार मीठ व साखर घालून कालवून १० मिनिटे एका बाजूला ठेवा. काकडीच्या किसाला चांगले पाणी सुटेल. मग तो कीस हाताने पिळून त्यातील पाणी एका बाउलमध्ये काढा.
गॅसवर एका काढल्यात फोडणीसाठी साजूक तूप गरम करून घ्या व त्यात चिमूटभर हिंग आणि अर्धा चमचा जिरे टाकून ते तडतडल्यावर ती फोडणी बाउलमध्ये काढलेल्या कढणावर घालून ढवळा.
हे स्वादिष्ट कढण ग्लास मध्ये काढून प्यायला द्या.
Leave a Reply