साहित्य : तेल, हिंग, मोहरी, कांदा, हिरवी मिरची, कडीपत्ता, बटाटे, पोहे, लिंबाचा रस, हळद, धणे पावडर, हवे असल्यास शेंगदाणे, चवीनुसार मीठ.
कृती : प्रथम कढई मध्ये तेल तापवून घ्या. तेल तापल्यावर त्यात हिंग, मोहरी, हिरवी मिरची, कडीपत्ता याची फोडणी द्या. त्यानंतर त्यावर बारिक चिरलेला कांदा घालून लालसर परतून घ्या. मग बटाटे घालून परतून घ्या. हवे असल्यास शेंगदाणे सुध्दा तेलावर परतून घ्या. मग हळद आणि एक चमचा धणेपूड घालून थोडेसे पाणी आणि लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ घाला. आता स्वच्छ धुतलेले जाड पोहे घालून मिश्रण चांगले एकजीव करुन घ्या. व वरुन बारिक चिरलेली कोथिंबीर घालून कांदे पोहे सर्व्ह करा.
Leave a Reply