साहित्य :- दीड वाटी साधी कंदी, दीड वाटी मावा, 1 वाटी पिठीसाखर, अर्धी वाटी दूध, सजावटीसाठी थोडीशी चेरी.
कृती :- मावा हाताने कुस्करून घ्यावा. नंतर कढईत मावा टाकावा व पाच मिनिटे मंद आचेवर परतून घ्यावा. आता त्यात पिठीसाखर टाकून व्यवस्थित मिसळावे. नंतर त्यात बुंदी टाकावी आणि त्यावर दुधाचे थेंब सतत शिंपडावे. मिश्रण चांगले मिसळल्यावर आच बंद करावी. थंड झाल्यावर त्याचे लाडू वळावेत. सजावटीसाठी प्रत्येक लाडूवर चेरीचा तुकडा ठेवावा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply