कण्हेरी

साहित्य:

२ वाट्या – जुने, सुवासिक आंबेमोहोर तांदूळ
थोडे तूप
मीठ
अर्धा टी स्पून – जिरे पूड
२-३ मिरी दाणे

कृती:

तांदूळ स्वच्छ धुवुन घ्या. फडक्यावर पसरा व सावलीत वाळवत ठेवा. वाळल्यानंतर अर्धवट कुटा. एका पातेल्यात तूप गरम करा. त्यात मिरी दाणे घालून तांदूळ, मीठ, जिरे पूड व पाणी घालून उकळी काढा. मऊसर शिजवा.

आजारी व्यक्तीसाठी कण्हेरी हे उत्तम व पचायला हलके अन्न आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*