कणीक व सांज्याचे घारगे
साहित्य :- एक कप गव्हाचा जाडसर रवा, दीड कप गूळ, 2 कप पाणी, वेलदोडे, जायफळ पूड व लागेल तशी कणीक, थोडं तेल.
कृती :- अगदी थोड्या तुपावर रवा भाजावा, गरम पाणी, थोडं मीठ घालून वाफ आणावी. गूळ घालून शिरा बनवावा. जरा गार झाल्यावर मावेल तेवढी कणीक घालावी. थोडं तेल पाणी लावून मळून, घारगे थापून तळावे. हे घारगे नैवेद्याला करतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
कणकेचा गोड शिरा
साहित्य :- 1 कप रवाळ कणीक, पाव कप रवा, 2 चमचे बेसन, पाऊण कप साजूक तूप, गूळ किंवा साखर 1 कप, वेलदोडे पूड अर्धा चमचा, 3 कप पाणी.
कृती :- तिन्ही पिठं एकत्र चाळावी. तुपावर खमंग भाजावी. साखर पाणी वेलदोडे पूड एकत्र उकळावे. कणकेत घालताना, गॅस बंद ठेवावा. नीट हलवून गॅस सुरू करावा. या शिऱ्यात तूप कमी झाल्यास गोळे होतील.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
कणकेचा केक
साहित्य :- दीड कप कणीक सैलसर रात्री भिजवून ठेवावी. (सकाळी कणीक आंबेल)
इतर साहित्य :- अर्धा कप जाड साखर, अर्धा चमचा सोडा, अर्धा चमचा मीठ, पाव चमचा व्हॅनिला इसेन्स.
कृती :- नॉनस्टिक पॅनला थोडं तेल लावावं. वरील साहित्य एकत्र करून, त्यात थोडंसं ताक घालावं. हे सैलसर मिश्रण पॅनमध्ये घालावं. गॅसवर छोटा तवा ठेवून त्यावर पॅन ठेवावा. मंद गॅसवर शिजवा. आठ-दहा मिनिटांनी उलटावं. पुन्हा थोडं तेल घालून शिजवावं. गोल्ड रंगाचा हा केक, लहान थोर सर्वांना खूप आवडेल. मुलांना देताना घरचं लोणी लावून द्यावा. तयार केक फुगलेला टपोरा दिसला पाहिजे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
कणीक, गाजराचा पौष्टिक केक
साहित्य :- पाव किलो कणीक, दीडशे ग्रॅम ब्राऊन शुगर, तीन गाजरं, पन्नास ग्रॅम अक्रोड, दोन चमचे बेकिंग पावडर, दोन मऊ केळी, 2 अंडी, दीडशे मिली तेल.
कृती :- गाजर धुऊन किसून पिळून घ्यावे. (रस ठेवावा) कणीक, बेकिंग पावडर, साखर, केळ्याचा लगदा, गाजराचा किस, अक्रोडचे तुकडे एकत्र करावे. तेल व अंडी मिक्स,रमध्ये फेसून घ्यावी. कणकेच्या मिश्रणात घुसळलेली अंडी व गाजराचा रस घालावा. मिश्रण दोन डब्यांत घालून पंचेचाळीस मिनिटे भाजावे. केकमध्ये विणायची सुई खुपसून बघावी. स्वच्छ निघाली तर केक झाला.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
राजस्थानी चुरमा
साहित्य :- 2 कप जाडसर कणीक, 2 टेबलस्पून तूप, थोडं दूध – एकत्र भिजवून वडे बनवून तळून घ्या. वडे मोडून मिक्सनरमध्ये फिरवून रवा तयार करावा. इतर साहित्य :- साजूक तूप, चिमूट हळद, वरील रवा पाच टेबलस्पून व पिठी साखर, आठ-दहा बदाम जाड कुटून, वेलदोडे पूड, थोडे खडीसाखरेचे खडे इ.
कृती :- तूप गरम करून त्यात चिमूट हळद, रवा घालून भाजावे. इतर साहित्य घालून लाडू वळावे. (हा चुरमा 2 प्रकारचा असतो. रोता चुरमा – या चुरम्यातून भरपूर तूप ओघळत असतं. हसता चुरमा मोकळा कोरडा असतो.)
खोबरं, कणकेचे लाडू
साहित्य :- दोन कप गव्हाला थोडंसं पाणी लावून ठेवावं. दहा मिनिटांनी भाजून, मिक्सोरमध्ये कणीक बनवून घ्यावी. साजूक तूप, एक कप नारळाचा चव, जायफळ, वेलदोडे, पिठीसाखर, आवडीनुसार काजू तुकडे इ.
कृती :- साजूक तूप गरम करून, त्यात नारळाचा चव सोनेरी रंगावर परतावा. काढून ठेवावा. त्याच तुपात वरील कणीक घालावी. गहू भाजल्यामुळे फार वेळ परतू नका. नारळाचा चव, भाजलेली कणीक, पिठीसाखर इ. सर्व घालून लाडू वळावे. तूप लागल्यास थोडं घालावं.
कणीक, मेथी पाक
साहित्य :- पाव किलो रवाळ कणीक, तूप 3 टेबलस्पून किंवा जास्त. 2 टेबल स्पून भाजून केलेली मेथीची पूड, केशर (ऐच्छिक) जायफळ पूड, सुंठपूड 2 चमचे, गूळ चारशे ग्रॅम, थोडं दूध, बदाम, पिस्ते, काजूकाप इ.
कृती :- तुपावर कणीक खमंग भाजावी. थोडं तूप व गूळ एकत्र करून गॅसवर ठेवावं. गूळ मऊ झाल्यावर केशरयुक्त शिंपडावं. त्यात भाजलेली कणीक, मेथीपूड, सुंठपूड इ. घाला. गोळा झाला की थाळीत, जाडसर थापावा. वर ड्रायफ्रूट पेरावे. कापून ठेवावे. हा पदार्थ थंडीत बनवावा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply