पीन-व्हील कचोरी
पारीसाठी साहित्य – कणीक, आमचूर, तिखट, हळद, धनेपूड, मीठ, तेल. सर्व अंदाजाने घेऊन पीठ भिजवावं.
सारणासाठी :- उकडलेल्या बटाट्याचा लगदा, धने, जिरे पूड, आमचूर तीळ, गरम मसाला, खोबऱ्याचा बारीक किस, आलं व मिरची पेस्ट, हळद, तिखट, मीठ सर्व कालवावं. पातळ पोळ्या लाटून घ्याव्या. एका पोळीवर सारण पसरावं. दुसऱ्या पोळीने झाकावं. घट्ट रोल बनवावा. थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून, आळूवडीप्रमाणे कापून तळावं. पुदिन्याचा चटणीबरोबर द्यावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
दही पकोडी
साहित्य – 2 कप कणीक, 1 कप बेसन, मीठ, हळद, तिखट, पाव चमचा सोडा.
कृती :- भज्यांच्या पिठासारखं भिजवावं. पकोडी तळून पाण्यात पंधरा – वीस मिनिटं ठेवावी. इतर साहित्य :- गार दही घुसळून, गाळून, मीठ घालून ठेवावं. खजुराची गोड चटणी, भाजलेल्या जिऱ्याची पूड, तिखट मीठ, थोडा पुदिना, थोडी कोथिंबीर चिरून, पाण्यातून पकोडी काढून, दह्यात घालावी. डिशमध्ये (सहा – सात) पकोडे घालून गोड चटणी व इतर साहित्य पेरून द्यावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
न्युट्री ब्राऊन ब्रेड
साहित्य :- अडीचशे ग्रॅम कणीक, 1 चमचा फ्रेश यीस्ट, पाऊण चमचा मीठ, (1 अंड ऐच्छिक) 10 ग्रॅम (दीड चमचा) साखर, कोमट पाणी.
कृती :- कणीक चाळून खळगा करून त्यात साखर, अंड, थोडं दूध घालून, दहा मिनिटे तेलाचा हात लावून मळा, तेल लावलेल्या भांड्यात ठेवून, तेल लावलेल्या प्लॅस्टिकने झाकावे. आकाराने दुप्पट झाल्यावर पुन्हा मळावे. ब्रेडच्या डब्यात घालून पुन्हा फुगू द्यावे. (डबा दोनतृतीयांशच भरावा म्हणजे पीठ फुगायला जागा राहील) 450 अंशांवर 30 मिनिटे भाजावं. भाजायला ठेवण्यापूर्वी ब्रशने दूध लावा. त्यावर बारीक दलिया पेरा. तीळ किंवा खसखस पेरता येईल. ब्रेडचा रंग ब्राऊन यायला हवा असल्यास 2चमचे कॅरामलसिरप पीठ भिजवताना घालावं. पिझ्झा बेस वर दिलेल्या ब्रेडच्या पिठाचाच पीझ्झा बेस बनवता येईल. फक्त पीठ मळताना अंड व बटर एक टेबल स्पून घालून पीठ मळावं. गोल, जाडसर पोळी लाटून काट्याने टोचून बेक करावं, पण पूर्णपणे ब्राऊन करू नका, कारण टोमॅटो सॉस, टॉपिंग, चीझ इ. घालून पुन्हा केक करावा लागेल.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply