साहित्य : १ वाटी कणीक, अर्धी वाटी बारीक चिरलेला गूळ, १ वाटी उकळीचे पाणी, १ अष्टमांश चमचा मीठ, १ डाव तूप, २ वेलदोड्यांची पूड.
कृती : तुमावर कणीक भाजून घ्यावी. मंदाग्नीवर भाजावे. छान वास आला की त्यावर उकळीचे पाणी घालावे. मीठ घालावे. जरा वेळ ढवळावे. पाणी आटले की गूळ घालावा. ढवळावे. झाकण ठेवून वाफ येऊ द्यावी. नंतर वेलदोड्यांची पूड घालून उतरवावे
Leave a Reply