साहित्य – अर्धा कप हरभरा डाळ, पाव कप तुरीची, पाव कप मुगाची डाळ, एक चमचा मेथी सर्व भिजवून वाटून घ्यावी. वाटताना 8 पाकळ्या लसूण, 4 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरे वाटून घ्यावे. त्यात मावेल तेवढी कणीक, तिखट, मीठ, हळद घालावी. सुपारीएवढा गूळ थोड्या पाण्यात घालून हे पाणी घालून सर्व एकत्र मळून घ्यावं. भोकाचे वडे बनवून तळावे.
रुमाली रोटी साहित्य – आठशे ग्रॅम कणीक, दोनशे ग्रॅम मैदा, शंभर मिली तेल, 2 अंडी, 50 ग्रॅम साखर, थोडं मीठ सर्व मिळून एक तास ठेवावं. एकसारखे लिंबाएवढे गोळे बनवून ठेवावे. अतिशय पातळ लाटून, उलट्या कढईवर भाजावे. बटर लावून रुमालासारखी घडी घालावी. नॉनव्हेज पदार्थांबरोबर द्यावे. (मैदा अगदी थोडा घालावा लागेल.)
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply