साहित्य:- बांगडे, पापलेट किंवा सूरमईचे ६-७ तुकडे,, एका लिंबाइतकी चिंच,, ८ – १० ब्याडगी मिरच्या किंवा ४ – ५ चमचे लाल तिखट, तांदळाची पिठी किंवा बारीक रवा एक वाटी, , तळण्यासाठी तेल, मीठ चवीनुसार.
कृती:- प्रथम चिंच, ब्याडगी मिरची एकत्र वाटून घेऊन त्याचा गोळा करावा. नंतर त्यात चवीनुसार मीठ घालून ते तसेच ठेवावे.(पाणी घालू नये). हे चिंच-मिरचीच मिश्रण माशाच्या तुकड्यांना लावावं आणि तुकडे अर्धा तास मुरवत ठेवावे. अर्ध्या तासाने तांदळाची पिठी आणि रवा एकत्र करून घ्यावा. माशाचे तुकडे या पीठात घोळवून घ्यावे आणि जरा जास्त तेलावर परतून घ्यावे.
टीप : माश्यांना नुसती तांदळाची पिठी किंवा बारीक रवा लावला तरी चालेल . चिंच-मिरची मध्ये आलं-लसूण वाटून घातले तरी चांगलं लागतं . चिंच–मिरची–मीठ घालून वाटून फ्रीजमध्ये ठेवली तर साधारण महिनाभर तरी टिकते. आयत्या वेळेस कधीही वापरता येते .
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply