साहित्य:- पुरणासाठी चण्याची डाळ शिजल्यावर चाळणीत घालून जास्तीचे पाणी काढून घ्यावे. हे डाळीचे पाणी म्हणजेच “कट’. चार वाट्या कट, छोट्या लिंबाएवढ्या चिंचेचा कोळ, पाव वाटी गूळ, दोन आमसुले, काळा मसाला दोन चमचे, तिखट-मीठ चवीनुसार, तमालपत्र दोन पाने, फोडणीसाठी तेल, मोहरी, जिरे, हिंग, हळद, कढीलिंबाची पाने.
कृती :- दोन चमचे तेलात मोहरी, जिरे, हिंग, हळद, कढीलिंबाची पाने घालून फोडणी करावी. त्यात तमालपत्राची दोन पाने घालावीत. नंतर चिंचेचा कोळ, आमसूल व कट घालून उकळावे. आवडीप्रमाणे तिखटपूड, मीठ व दोन चमचे काळा मसाला घालावा. गूळ घालावा अथवा गुळाऐवजी वाटून तयार केलेले थोडे पुरण घालावे म्हणजे आमटीला दाटपणा येईल. आमटी चांगली उकळून घ्यावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply