कटोरीसाठी साहित्य:- १ वाटी मैदा, १ वाटी कणीक, दोन चमचे तेल, चवीनुसार मीठ, तळणीसाठी तेल.
सारण:- मोडाची मिक्स१ कडधान्ये, दोन उकडलेले बटाटे, एक टोमॅटो बारीक चिरून, 1 कांदा बारीक चिरून. सजावटीसाठी : बारीक शेव, चिंच- खजूर चटणी, कोथिंबीर.
कटोरीची कृती:- मैदा आणि कणीक, तेल, मीठ टाकून घट्ट भिजवावी. दहा ते पंधरा मिनिटं झाकून ठेवावी. अगदी छोट्या स्टीलच्या वाट्या घ्याव्यात. त्या वाट्यांना बाहेरील बाजूने तेल लावावे. मळलेल्या पिठाच्या छोट्या पुऱ्या लाटाव्यात व त्या वाटीभोवती गुंडाळा आणि वाटीसकट तापलेल्या तेलात तळून घ्याव्यात. अशा सगळ्या वाट्या तयार करून ठेवाव्यात. आदल्या दिवशीही अशा वाट्या तयार करून ठेवू शकता. कडधान्यांची कोरडी उसळ तयार करावी. उसळ जास्त शिजवू नये. मैद्याच्या कटोरीत कडधान्यांची उसळ, त्यावर कांदा, टोमॅटो,कोथिंबीर, चिंचेची चटणी आणि शेव घालावी. सर्व्ह करावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply