केळफुलाची भाजी

साहित्य: १ मध्यम केळफूल, २ कांदे, थोडेसे पांढरे वाटाणे, १/२ चमचा सारस्वत मसाला, १ वाटी ताक, १ वाटी पाणी, ३-४ हिरव्या मिरच्या, थोडा गूळ (optional), मीठ, फोडणी, खोबरं, कोथिंबीर.

केळफूलाच्या भाजीची कृती: केळफूल नीट करून बारीक चिरावे आणि ताक + पाण्यात घालावे. भाजी  सकाळी करायची असल्यास केळफूल चिरून ताक व पाण्यात रात्रीच घालून ठेवावे. थोडे वाटणे रात्रीच पाण्यात भिजत घालावेत. केळफूल चोळून दोंन तीन वेळा पाण्यातून धुवून काढावे म्हणजे राप जातो. केळफूल व वाटणे वेगवेगळे शिजवून घ्यावेत (कुकरमध्ये) कांदा बारीक चिरावा, मिरच्या उभ्या चिराव्यात.
कढईत तेल गरम करून कांदा मिरची हिंग हळद घालावे. शिजलेले केळफूल व वाटाणे घालावेत. मसाला घालावा. मीठ कोथिंबीर खोबरं गूळ (optional) टाकून थोडा वेळ शिजवावे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*