साहित्य: पाऊण लिटर दूध, १/२ वाटी ताजा मावा, १/२ ते पाऊण वाटी साखर, १/२ वाटी बदामाचे काप,२ चमचे कॉर्न फ्लोअर, १/२ चमचा वेलची पूड, चिमूटभर केशर.
कृती :- बदामाची पूड करून घ्यावी. दूध गरम करून आटवावे. आटवतानाच बदाम पूड आणि साखर घालावी. साधारण अर्धे होईल इतपत आटवावे. आटवताना सारखे ढवळत राहावे, ज्यामुळे दूध भांडय़ाच्या तळाला लागणार नाही. मावा हाताने मोकळा करून घ्यावा. त्यातील गुठळ्या हाताने मोडाव्यात. दोन टे.स्पून गार दुधात कॉर्न फ्लोअर मिक्स करावे, हे दूध आटवलेल्या दुधात घालावे व ढवळावे. हळूहळू दूध घट्टसर होईल. दूध घट्टसर झाले की वेलची पूड, केशर आणि मावा दुधात घालावा. थोडे गरम करावे. सर्व नीट मिक्स करावे. मिश्रण थोडे कोमट झाले की कुल्फीपात्रात किंवा हिंडालियमच्या पात्रात मिश्रण ओतून फ्रीजरमध्ये सेट करण्यास ठेवावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply