साहित्य : एक वाटी डाळीचे पीठ, एक वाटी आंबट ताक, एक टीस्पून इनो फ्रूटसॉल्ट, मीठ, साखर.
कृती : काचेच्या पसरट भांडय़ात ओला रुमाल पसरा. दुसऱ्या भांडय़ात सर्व पदार्थ एकत्र करून चांगले हलवा. त्यात इनो फ्रूटसॉल्ट घालून चांगले हलवा व पीठ वर आले की, रुमालावर ओता. झाकण ठेवा. १०० टक्के पॉवर अडीच मिनिटे ठेवा. नंतर ५० टक्के पॉवरवर ३ मिनिटं ठेवा. बाहेर काढा. बाहेर काढून पाण्याचा हबका मारा. (असे केले तर खाताना घशात अडकत नाही) गार झाल्यावर तेलाची फोडणी टाका. वरून खोबरे, कोथिंबीर घालून सव्र्ह करा. टीप : रुमाल न ठेवता पण ढोकळा करू शकता, पण काचेच्या भांडय़ात जरा वेळाने कडा कडक होतात. मऊ राहत नाही.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply