
साहित्य :- एक वाटी वरी तांदूळ, पाव वाटी तूप, चवीला मीठ, पाव वाटी अळीव, अर्धी वाटी ओले खोबरे, दीड वाटी गूळ, दोन वाट्या गरम पाणी, अर्धी वाटी गरम दूध, अर्धा चमचा जायफळपूड, 10-12 काजू.
कृती :- अळीव दुधात दोन तास भिजत घालावेत. वरी तांदूळ धुवून घ्यावेत. एक मोठा चमचा तूप गरम करून त्यात तांदूळ परतावेत. मीठ आणि पाणी घालून शिजवावे. उरलेले तूप गरम करून त्यात काजू परतावेत. खोबरे, अळीव तसेच गूळ घालून शिजवावे. मिश्रण थोडे चिकट झाले, की शिजलेले वरी तांदूळ घालून ढवळावे. तांदूळ मोकळे होईपर्यंत ढवळावे, जायफळपूड घालावी. एका थाळीला तुपाचा हात लावून त्यावर हे मिश्रण घालून थापावे. गार झाल्यावर वड्या पाडाव्यात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply