
साहित्य:- १किलो पनीर, १ किलो खवा, १/४ किलो मैदा, चिमुटभर खाण्याचा सोडा, १ किलो साखर, बेदाणे, वेलची पूड, तूप.
कृती:- पनीर कुस्करून घ्यावे. त्यात खवा, मैदा व अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालून खूप मळून घ्यावे. त्याचे लांबट आकाराचे छोटे गोळे बनवावेत. प्रत्येक गोळ्यात बेदाणा घालावा. हे गोळे मंद आंचेवर तुपात लाल रंगावर तळून घ्यावे. साखरेचा कच्चा पाक तयार करून त्यात हे गोळे घालावेत. ४-५ मिनिटे पाकात ठेवून बाहेर काढावेत. नंतर पाक पुन्हा विस्तवावर ठेवून पक्का करून घ्यावा. त्यात वेलची पूड घालावी. खीर मोहनचे गोळे पुन्हा पाकात घालून सर्व्ह करावेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply