साहित्य:
२ कप तांदूळ
एक कप मूग डाळ
एक मोठा बटाटा व दोडका (साले काढून व लांब फोडी करुन)
दोन कांदे लांबट चिरुन
दोन मोठे व लाल टोमॅटो (चिरुन)
३ ते ४ हिरव्या मिरच्या
२ टीस्पून – समप्रमाणात घेतलेले आले व लसूण वाटून
फ्लॉवरचे मोठे तुरे
१ गाजर (तुकडे करुन)
३ टेबलस्पून – फोडणीसाठी तूप
जिरे, हिंग व मोहरी
३ ते ४ लवंगा
२ ते ३ वेलच्या
एक दालचिनी कांडी
एक तेजपत्ता
३ ते ४ मिरी दाणे
हळद
कृती:
सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून चिरुन ठेवाव्यात. एका पातेल्यात तूप घालून जिरे, हिंग, मोहरी घालून फोडणी करा. त्यात मिरी दाणे, हळद, दालचिनी लवंगा, हिरव्या मिरच्या हे सर्व साहित्य व आलं-लसणाचे वाटण टाकून परता. मग कांदा परता. तो लालसर होत आला की त्यात टोमॅटो घाला.
त्याला वर तेल सुटायला लागलं की मग सर्व चिरलेल्या भाज्या घाला. परता. भाज्या लालसर झाल्यावर त्यात डाळ व तांदूळ घाला. परता. व पाणी आणि मीठ घालून शिजवा. अशाप्रकारे गरमागरम भाज्यांची खिचडी तयार.
खिचडीवर गरमागरम तूप घालून सर्व्ह करावे. भाज्यांच्या फोडी मोठ्या ठेवाव्यात म्हणजे त्यांचा लगदा होणार नाही. व दिसायलाही सुरेख दिसेल.
Leave a Reply