खिमट आपण लहान मुलांना देतो. पण आजारी माणसालाही पचायला ते बरंच की.
साहित्य – २ टेबलस्पून मूगडाळ आणि तांदळाचा एकत्र रवा (दोन्ही धुवून भाजून मिक्सरला जाडसर वाटा), पाव टीस्पून जिरे पूड, अर्धा टीस्पून साजूक तूप, मीठ चवीनुसार, १ कप पाणी.
कृती – लहान कुकरला सगळं साहित्य एकत्र करा. मंद गॅसवर ५-७ मिनिटं ठेवा. पाण्याचं प्रमाण आपल्या आवडीनुसार वाढवा.
Leave a Reply