
साहित्य:- १२ ते १५ कोलंब्या, दोन चहाचे चमचे आले+ लसूण पेस्ट, एक चहाचा चमचा लाल मिर्चीपूड, अर्धा चहाचा चमचा हळद पूड, मीठ चवीनुसार, दोन पळ्या तेल.
कृती:- तेलात सर्व जिन्नस मिसळून ते कोलंब्याना व्यवस्थित चोळून घ्या. अर्ध्या तासानंतर नॉनस्टिक तवा तापवून,तव्यात पसरून वर झाकण ठेवा.गॅस मंद करा. पाच मिनिटांनी झाकण काढून दुसऱ्या बाजूवर पलटा.आता झाकण काढून शिजूद्या. गॅस मंदच असुद्या. पाणी सुटले असेल. ते आटल्यावर पुन्हा एकदा पलटून दोन मिनिटांनी आच बंद करा. गरमागरम वाफाळता भात आणि कोणतीही आमटी याबसोबत आस्वाद घ्या.
Leave a Reply