
साहित्य:- कोथिंबीरीच्या काड्या १ कप, कांदा १ मोठा नग, टॉमेटो २ छोटे नग.
लसूण पाकळ्या ४ नग, मीठ चवीनुसार, जिरे १/२ चमचा, तूप १ चमचा, दालचिनी १ इंच तुकडा, हिंग चिमुटभर.
कृती – टॉमेटोला चिरा द्याव्यात, कांद्याचे मोठे तुकडे करावे, टॉमेटो, कांदा, कोथिंबीर काड्या, लसूण एकत्र करून वाटीभर पाणी घालून कुकरमध्ये १ शिटी करून वाफवून घ्यावे, पाण्यातून उपसून मिक्सर / ब्लेंडर मध्ये बारीक वाटून घ्यावे, चाळणीतून गाळून घ्यावे, भांड्यात तूप गरम करून त्यात हिंग, जिरे, दालचिनीची फोडणी करावी, त्यावर गाळलेले मिश्रण घालून त्यात शिजविण्यासाठी वापरलेले पाणी घालावे, मीठ घालून १ उकळी आणावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply