साहित्य: कोथिंबीर, कापुन- १ मोठी जुडी (अंदाजे ४ कप) बेसन- २ १/४ कप तांदळाचे पीठ- १ टेबलस्पून हळद- १ टिस्पून हिंग- १/२ टिस्पून मिरची पुड- २ ते ४ टिस्पून (आवडीप्रमाणे) जिरे पुड – १/२ टेस्पून तीळ – 2 टेबलस्पून खसखस- १ टिस्पून मीठ- चवीनुसार तेल- आवश्यकतेनुसार पाणी- फार थोडे (अगदी १ टेबलस्पून)
कृती: कोथिंबीर निवडून घ्या. लहान, कोवळी देठे पण घ्या. कोथिंबीर धुवा आणि चाळणीत ठेऊन निथळून घ्या. पाणी निथळल्यावर कोथिंबीर चिरून घ्यावी. तेल आणि पाणी वगळता कोथिंबीर आणि सर्व साहित्य परातीत एकत्र करा. चांगले मिक्स करावे. १ टेबलस्पून तेल गरम करून मिश्रणात ओतावे. चमच्याने मिक्स करावे. थोडे थोडे पाणी घालावे आणि छान एकत्र मळून गोळा बनवा. त्याचे २ भाग करून लंबगोल आकाराचे गोळे/उंडे करा. भांड्याला आतून थोडे तेल लाऊन घ्या, त्यात ते गोळे ठेवा. २० मिनीटे वाफवुन घ्या. (मी मायक्रो-ओव्हन मध्ये वाफवले, साधारण ६ ते ८ मिनीटे लागतात.) वाफवून झाले कि त्या गोळ्यात सुरी किंव्हा टूथ-पिक टोचा, ती बाहेर स्वच्छ आली तर वडी शिजली आहे. थंड झाल्यावर साधारण पाव इंचाचे काप करा. वड्या सोनेरी रंगावर तळून (शालो फ्राय किंवा डीप फ्राय) घ्या. एक नाश्ता म्हणून हिरव्या चटणी आणि टोमॅटो केचपबरोबर किंवा जेवणात तोंडीलावणे म्हणुन कोथिंबीर वडी गरम सर्व्ह करावी.
टिप: दुसऱ्या पद्धतीने कोथिंबीर वडी करू शकतो. थाळीला तेल लाऊन त्यात कोथिंबीरीचे मिश्रण थापावे. वाफवून घेऊन थंड झाल्यावर चौकोनी वड्या पाडाव्यात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply